शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची ? :

 

 बुधवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी...

<p>शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची ? :</p>

<p> </p>

मुंबई - शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि पक्षनाव शिवसेना हे एकनाथ शिंदे गटाला दिले. उध्दव ठाकरे यांनी आयोगाच्या निर्णयाला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आयोगाचा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडल्यानंतर आयोगाने अजित पवार यांना पक्षचिन्ह घड्याळ आणि पक्षनाव दिले. या दोन्ही प्रकरणांवर न्यायालयाने प्राथमिक सुनावण्या घेतल्या असून आता अंतिम टप्प्याकडे सुनावणी पोहोचली आहे. बुधवार २१ जानेवारी पासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग दोन दिवस दोन्ही राष्ट्रवादी गटांचे आणि शिवसेना गटांचे युक्तीवाद ऐकूण घेणार आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ कुणाचे याचा निकाल न्यायालय लवकरच जाहीर करणार असून या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.