नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता दाखवा अन्यथा...: भाजपाच्या 22 उमेदवारांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र
अमरावती – अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपला बहुमत न मिळण्याने नवनीत राणा यांच्या विषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. तसेच निवडणुकीच्या प्रचारावेळी नवनीत राणा यांनी, मी कोणालाही उत्तर देण्यासाठी काम करत नाही, मी भाजपसाठी काम करते, कोणी काही टीका केली तरी ते मंचावर येऊनच बोलू शकतात. कोणी टीका केली ते समोर बोलले नाहीत, माझ्या पाठीमागे बोलले आहेत, पाठीमागे कोणीही टीका करते म्हणून तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला, असे म्हटल्या होत्या.
त्यानंतर महापालिकेत भाजपला केवळ 25 जागांवर समाधान मानावं लागल्याने भाजपाच्या 22 उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नवनीत राणा यांना पक्षातून निष्कसित करा अशी मागणी केली आहे. नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत, असेही पत्रात म्हटले आहे.