सत्याला दडपून लोकांची दिशाभूल करणारे भाजपवाले एका माणसाला का घाबरलेत? : आ. सतेज पाटील
कोल्हापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीका केल्या प्रकरणी डॉ संग्राम पाटील यांना काल मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर मुंबई पोलिसांनी त्यांची चौकशी करून तब्बल 15 तासांनंतर त्यांची सुटका केली. यावर आ. सतेज पाटील यांनी, “भाजपच्या विचारधारेला आणि त्यांच्या सर्व नेत्यांना प्रश्न विचारणाऱ्यांची भीती का वाटते ?, सत्याला दडपून लोकांची दिशाभूल करणारे भाजपवाले एका माणसाला का घाबरलेत?”, असा सवाल त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
आ. सतेज पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे कि, ‘सत्य आणि विवेकाच्या आधारावर सत्तेला प्रश्न विचारणारे डॉ. संग्राम पाटील यांना विमानतळावर करण्यात आलेली अटक ही भाजप सरकारच्या डरपोकपणाचे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे डॉ. संग्राम पाटील यांच्या अटकेचा मी जाहीर निषेध करतो’