पोस्टल मतदानाद्वारे आज 442 मतदान

<p>पोस्टल मतदानाद्वारे आज 442 मतदान</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी आज पहिल्या दिवशी 442 कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण सात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये पोस्टल मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये 197 महिला कर्मचारी व 245 पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रविवारी 11 जानेवारी 2026 रोजी उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मतदान करता येणार आहे. तरी संबंधीत कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.