फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या संघटनांचा काँग्रेसला जाहीर पाठिंबा

वादळात दिवा लावायची ताकद फक्त बंटी साहेबांकडे - मा. आमदार ऋतुराज पाटील

<p>फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या संघटनांचा काँग्रेसला जाहीर पाठिंबा</p>

कोल्हापूर - नवीन वाशी नाका परिसरातील दुर्वांकुर हॉलमध्ये शुक्रवारी फुले, शाहू, आंबेडकरवादी संस्था आणि सर्व समविचारी परिवर्तनवादी उपनगरीय संघटनांकडून सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दिन साजरा केला. शिक्षणासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला. याच कार्यक्रमात सर्व संघटनांच्या वतीनं काँग्रेस प्रणित शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज आपण जर मागे पडलो तर महापालिका अदानी-अंबानींच्या हाती जाईल आणि ती प्रायव्हेट होईल. असं सांगितलं एकीकडं दहाजण विरोधात असले तरी वादळात दिवा लावायची ताकद फक्त बंटी साहेबांकडं असल्याचं माजी आमदार ऋतूराज पाटील यांनी सांगितलं.

शिवराज पाटील यांनी, संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते दिल्ली अशी भारत जोडो पदयात्रा काढली. म्हणून सर्व मागासवर्गीय समाजानं महाविकास आघाडीला सहकार्य करावं, असं आवाहन केलंय.

यावेळी उमेदवार धीरज पाटील यांनी प्रभागात आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपये खर्चुन अद्यावत बाग विकसित करण्यात आल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाला विष्णू कांबळे, लक्ष्मण द्रविड, शामराव माने, पी. एस. कांबळे, बी. के. कांबळे, एन. आर. देसाई, बी. एस. कांबळे, सर्जेराव कामत, आशिष पाटील, साहिल देसाई आदि उपस्थित होते