व्हिजनरी नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहण्याचा नागरिकांचा निर्धार - स्वरूपा पोवार 

<p>व्हिजनरी नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहण्याचा नागरिकांचा निर्धार - स्वरूपा पोवार </p>

कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक वीस मधील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री धनाजी कांबळे, उत्कर्षा आकाश शिंदे, धीरज भिवा पाटील, मयुरी इंद्रजीत बोंद्रे, आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजू आनंदराव दिंडोर्ले यांच्या प्रचारार्थ बैठका घेण्यात आल्या. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठका आयोजित करण्यात आल्या. साळोखे नगर मधील मोरे माने नगर इथून बैठकांना सुरुवात झाली. यानंतर चव्हाण कॉलनी, चंद्रकांत भोसले कॉम्प्लेक्स, महादेव नगरी, पार्वती पार्क, गणपती नगर, श्री दत्त कॉलनी अशा विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी, येणाऱ्या काळात कोल्हापूरचा विकास कसा करता येईल आणि जनतेच्या मनातील शहर कसं निर्माण करता येईल हा उद्देश घेऊन या निवडणुकीला सामोरं जात असल्याचं सांगितलं. " कोल्हापूर कस्सं तुम्ही म्हणशीला तस्सं च्या अनुषंगानं कोल्हापूरकरांनी मांडलेल्या सूचनांचा विचार काँग्रेसच्या जाहीरनाम्यात करण्यात आला असून येणाऱ्या काळात या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं.

यावेळी स्वरूपा पोवार यांनी, आमदार सतेज पाटील यांच्या रूपानं, कोल्हापूर शहराला पुढं घेऊन जाणारा एक व्हिजनरी नेता लाभल्याचं सांगितलं.

यावेळी शिवाजी चौगले, संदीप चौगले, अमर चव्हाण, सुमन सूर्यवंशी, जनार्दन सूर्यवंशी, सुमेधा चव्हाण, शर्वरी चव्हाण, श्रेया सूर्यवंशी, गुंडू पोवार, विमल पोवार, विनायक पोवार, मधुरा पोवार, रजनी राऊत, रंजना शिपुगडे, जया पाटील, अमोल धनाल, मयुरेश रामपूरे, दिनकर सावेकर, उमेश साळोखे, सारिका पाटील, वैशाली चिले, अरुण मंडळकर, सुप्रिया चिले, दिपाली मंडलिक, सीमा चिले, पुष्पा गोसावी, श्रीकांत मोरे, संजय साळोखे, हेमंत भोसले चावरेकर, बाळासो भोसले चावरेकर, राजेंद्र पतकी, मिनल पतकी, बी आर पाटील, अजिक्य पाटील, महादेव कुंभार, अजिंक्य राऊत, बाळासाहेब जाधव, अक्षय आळवणी, दत्तात्रय मानकर, प्रकाश जाधव आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.