“पुणेकरांचा अधिकारनामा”: आनंददायी आणि सुरक्षित पुण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध

<p>“पुणेकरांचा अधिकारनामा”: आनंददायी आणि सुरक्षित पुण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध</p>

पुणे - पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाने “पुणेकरांचा अधिकारनामा” जाहीर केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पुणे काँग्रेस कमिटी कार्यालयात हा अधिकारनामा प्रसिद्ध करण्यात आला.

काँग्रेस पक्षाने “पुणेकरांचा अधिकारनामा” जाहीर करत “पुणे फर्स्ट” ही संकल्पना मांडली आहे. आरोग्यदायी, आनंददायी आणि सुरक्षित वातावरणात जागतिक दर्जाचं जीवनमान मिळणं हा प्रत्येक पुणेकरांचा मूलभूत अधिकार असल्याचं या अधिकारनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, उत्तम आरोग्य सुविधा, स्वच्छता, वाहतूक आणि जीवनमान उंचावण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

“पुणे फर्स्ट” या भूमिकेतून प्रत्येक पुणेकराला सुरक्षित, आरोग्यदायी आणि आनंदी जागतिक दर्जाचे शहर अनुभवता यावे, हा आमचा संकल्प असल्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, प्रशांत जगताप, अभय छाजेड, अजित दरेकर, मेहबूब नदाफ, दिप्ती चौधरी, स्वाती शिंदे, अर्चना शहा यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.