उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शक्तिप्रदर्शनाला हद्दपार केलेल्या उमेदवाराची उपस्थिती... अनेकांच्या भुवया उंचावल्या
सांगली - सांगली महापालिका निवडणुकीतील उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सांगलीत आले होते. यावेळी त्यांच्या शक्तिप्रदर्शनाला पोलिसांनी हद्दपार केलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार आझम काझीने उपस्थिती लावली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
हद्दपार कारवाईच्या पार्श्वभूमीवर काझी याच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या सभास्थळी काझी यांचे पोस्टर हातात घेऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. थेट हद्दपारीची कारवाई झाल्याने आझम काझी हा अजित पवार यांना भेटण्याच्या प्रतिक्षेत होता. मात्र, आझम काझीची अजित पवार यांनी भेट घेणे टाळलं. काझी उभा असलेल्या ठिकाणावरून न जाता दुसऱ्या मार्गाने अजित पवार व्यासपीठावर उतरून रवाना झाले.