काँग्रेस उमेदवारांना राजे संभाजी तरुण मंडळाचा जाहीर पाठिंबा

<p>काँग्रेस उमेदवारांना राजे संभाजी तरुण मंडळाचा जाहीर पाठिंबा</p>

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठमधील काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे उमेदवार इंद्रजीत बोंद्रे, प्रशांत उर्फ भैय्या खेडकर, ऋग्वेदा माने व अक्षता पाटील यांनी शिवाजी पेठेतील राजे संभाजी तरुण मंडळाला भेट दिली. यावेळी मंडळाच्या वतीने उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मंडळाने काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा जाहीर केला. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व उपस्थित नागरिकांचे आभार मानले.

कार्यक्रमास राजे संभाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिकेत चौगुले, उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.