...ही तर भाजपची वैचारिक दिवाळखोरी - स्व.विलासराव देशमुखांवरील वक्तव्यावरून आ.सतेज पाटील यांची टीका
कोल्हापूर - पत्रकार दिनानिमित्त आज आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. अशा प्रकारचे वक्तव्य हे भाजपची वैचारिक दिवाळखोरी आहे, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना तरी हे वक्तव्य मान्य आहे का ?, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला.
महापुरूषांबद्दल भाजपकडून चुकीची वक्तव्ये केली जात आहे. पुस्तकांमधून वाचला जाणारा इतिहास भविष्यात डिजीटल फूटप्रिंटवर वाचला जाणार आहे. याच डिजीटल फूटप्रिंटवर भाजपकडून महापुरूषांविषयी चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. जेणेकरून पन्नास वर्षानंतर हा इतिहास सत्य वाटेल असे हे षडयंत्र असल्याचा, आरोप आमदार पाटील यांनी केलाय.
सध्या उमेदवारांना उचलून घेऊन जाणे, पैशाचे आमिष दाखवणे असा नवा ट्रेंड सुरू आहे. अशा स्थितीत उद्या निवडणुकाही होणार नाहीत, अशी भीती आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.