निवडणूक आयोग बरखास्त करण्याची संजय राऊत यांची मागणी
मुंबई – राज्यातील महापालिका निवडणुकीतील बहुतांश ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. याविरुद्ध मनसेने हायकोर्टात धाव घेत चौकशी करण्याची मागणी याचिकेत केली आहे. यावर खा. संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि बिनविरोध झालेल्या प्रकारावर हल्लाबोल केला आहे.
यावेळी खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे कि, आयोग सत्ताधा-यांचा एजंट म्हणून काम करत आहे. महापालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध झाले आहेत. हे बिनविरोध सरळ मार्गानं झालेलं नाही हे स्पष्ट दिसतंय. निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्यात का?, असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे.