काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन
पुणे - काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज पुण्यातील निवासस्थानी निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय 82 वर्ष होते.
काँग्रेसची केंद्रात सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे सुरेश कलमाडी हे अनेक वर्षे पुण्याचे खासदार राहिले होते.
सुरेश कलमाडी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष होते आणि 2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन समितीचे अध्यक्ष होते. सुरेश कलमाडी भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक होते त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द डागाळली होती.