कोल्हापुरातील ‘या’ प्रभागात काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन...
कोल्हापूर – महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ. सतेज पाटील यांच्या हस्ते झाले.
राजारामपुरी येथील प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचे उमेदवार रोहीत कवाळे हे उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी शिवसेना शहराध्यक्ष सुनिल मोदी, माजी महापौर कांचनताई कवाळे, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, अनिल कदम यांच्यासह उमेदवार संजय मोहीते, अश्विनी कदम, प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, रघुनाथ टिपुगडे, विशाल देवकुळे, विनायक सुर्यवंशी, राजदिप भोसले, विनायक पाटील, किशोर खानविलकर, संजय पवार उपस्थित होते.