‘या’ दोन्ही गटांच्या राड्यात भाजपचे आमदार, माजी मंत्र्यांसह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल...
बैंगलोर – कर्नाटकातील बेल्लारीत वाल्मिकी बॅनर फाडल्यावरून भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये राडा झाला आहे. या हिंसक संघर्षात एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भाजप आमदार जनार्दन रेड्डी, माजी मंत्री श्रीरामुलु, शेखर, अलीखान आणि सोमशेखर रेड्डी यांच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्या 3 जानेवारी रोजी शहरात वाल्मिकी पुतळ्याच्या अनावरण समारंभापूर्वी पोस्टर आणि बॅनर लावणाऱ्या भाजप आमदार जनार्दन रेड्डी आणि काँग्रेस आमदार भरत रेड्डी यांच्या समर्थकांमध्ये हा संघर्ष झाला आहे. भारत रेड्डी यांचे समर्थक अवंभवी परिसरातील जनार्दन रेड्डी यांच्या घरासमोर बॅनर लावण्याचा प्रयत्न करत होते, ज्याला रेड्डी यांच्या समर्थकांनी विरोध केला. यामुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांवरही हल्ला करण्यात आला. गर्दी पांगवण्यासाठी लाठीमार करण्यात आला आणि हवेत गोळीबारही करण्यात आला आहे.