कोल्हापुरात महायुतीला धक्का..!  

 माजी नगरसेवकाने काँग्रेसमध्ये केला प्रवेश... 

<p>कोल्हापुरात महायुतीला धक्का..!  </p>

कोल्हापूर – राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा माजी नगरसेवक अमोल माने यांनी आज काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीला धक्का बसला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला रामराम ठोकत त्यांनी  महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. आज सकाळी अमोल माने आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या उपस्थितीत आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
माने यांच्या पाठिंब्यामुळे दक्षिण मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठे पाठबळ मिळाले आहे. अमोल माने यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेत प्रभाग क्रमांक 20 आणि प्रभाग क्रमांक 9 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.  यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज पाटील, मयुरी बोंद्रे,नंदू पिसे,राजू दिंडोर्ले उपस्थित होते.