मनसेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका...
मुंबई - ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. १९ वर्षांहून अधिक काळ पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या ११ महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मनसेची स्थापना झाल्यापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ११ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने वांद्रे पश्चिम आणि पूर्व भागातील मनसेत खळबळ उडाली आहे.
वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९७ आणि प्रभाग क्रमांक ९८ मधील या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. अंतर्गत नाराजीमुळे या घडामोडी घडल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.