भाजपला मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही : खा. संजय राऊतांचा आरोप 

<p>भाजपला मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही : खा. संजय राऊतांचा आरोप </p>

मुंबई – भाजपला मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


मुंबईत गुजराती समाजाविरुद्ध मराठी माणसाची लढाई कधीच नव्हती. मात्र केंद्रात मोदी-शहा यांचे राज्‍य आल्‍यापासून त्यांनी गुजराती समाजाविरुद्ध मराठी असा राजकारणासाठी रंग दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच सांगितले की, गुजराती समाजाची लक्ष्मी आणि आमची सरस्वती एकत्र आली तर आपण देशावर राज्य करू; पण यांना फक्त लक्ष्मीचं राज्य आणायचं आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.