ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पालकमंत्री आबिटकर आणि आमदार क्षीरसागरांवर बरसले...
कोल्हापूर - महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
रामभाऊ दादांच्या दारात लोटांगण घालणाऱ्या क्षीरसागर यांनी त्यांच्या घरातील उमेदवाराला तिकीट नाकारून मंदिराच्या पायरीला लाथ मारलीय, अशी टीका त्यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या मुलाचे तिकीट कापून ते एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला दिल्याचा आरोप रविकिरण इंगवले यांनी केला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहराचे वाटोळे केले आहे, असा घणाघातही इंगवले यांनी केला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंच्या आरोपांमुळे ऐन निवडणूकीत पुन्हा एकदा इंगवले - क्षीरसागर असा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.