जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसकडून उमेदवारी अर्जांचे वितरण
कोल्हापूर - राज्यात लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी मागणीसाठी अर्ज वितरित करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूरचे खासदार श्री शाहू छत्रपती महाराज व विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
उमेदवारी मागणीचे अर्ज २९ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.