कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ : काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

<p>कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ : काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर</p>

कोल्हापूर — आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्य निवड मंडळाच्या मान्यतेने व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही यादी मंजूर करण्यात आली. खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

या यादीत एकूण १४ उमेदवारांचा समावेश असून निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे काँग्रेस पक्षातर्फे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

 

निवड झालेल्या उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे :

प्रभाग १ (अनुसूचित जाती) – सुभाष राजाराम बुचडे,

प्रभाग १ (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला) – पुष्पा निलेश नरुटे,

प्रभाग १ (सर्वसाधारण महिला) – रुपाली अजित पोवार (धामोडकर),

प्रभाग १ (सर्वसाधारण) – सचिन हरिष चौगले,

प्रभाग ५ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) – विनायक कृष्णराव कारंडे,

प्रभाग ५ (सर्वसाधारण महिला) – सरोज संदीप सरनाईक,

प्रभाग ५ (सर्वसाधारण महिला) – स्वाती सागर यवलुजे,

प्रभाग ९ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) – नंदकुमार किरण पिसे,

प्रभाग ११ (सर्वसाधारण) – संदीप सुभाष सरनाईक,

प्रभाग १३ (सर्वसाधारण) – दिपक बबनराव थोरात,

प्रभाग १५ (अनुसूचित जाती) – रोहित शिवाजीराव कवाळे,

प्रभाग १६ (सर्वसाधारण महिला) – धनश्री महेश कोरवी,

प्रभाग १६ (सर्वसाधारण महिला) – पद्मावती काकासाहेब पाटील,

प्रभाग १७ (नागरिकांचा मागास प्रवर्ग) – सचिन मारुती शेंडे,

 

या निवड प्रक्रियेसाठी शहराध्यक्ष सचिन चव्हाण व सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे समिती सदस्य बुद्धीहाळकर, आनंद माने, राजेश लाटकर, भारती पोवार, सरलाताई पाटील, दौलत देसाई, तौफीक मुल्लाणी, विक्रम जरग व भरत रसाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.