आमदार सतेज पाटील यांनी सकाळी शहरातील विविध भागांत जाऊन नागरिकांशी साधला संवाद

<p>आमदार सतेज पाटील यांनी सकाळी शहरातील विविध भागांत जाऊन नागरिकांशी साधला संवाद</p>

 

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून काँग्रेसकडून निवडणूक तयारीला वेग आलाय. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा अनोखा उपक्रम राबवलाय. "कोल्हापूर कस्सं.. तुम्ही म्हणशीला तस्सं" या टॅगलाईनखाली आमदार पाटील यांनी आज सकाळी सायबर कॉलेज चौक, राजारामपुरी, जनता बाजार चौक आदी विविध ठिकाणी अचानक भेटी दिल्या. यावेळी चहा टपरी, नाश्ता सेंटर आणि सार्वजनिक ठिकाणी लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधत नागरिकांच्या समस्या, गरजा आणि सूचना जाणून घेतल्या. या उपक्रमामुळं जाहीरनाम्याच्या तयारीत स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळणार असून त्यांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास होण्यास मदत होणारय. पारंपरिक प्रचारपद्धतींपेक्षा वेगळा उपक्रम राबवत काँग्रेसनं कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नागरिकांचा जाहीरनाम्यात थेट सहभाग सुनिश्चित केलाय.

यावेळी माजी उपमहापौर मोहिते, विनायक सूर्यवंशी, महेश उत्तुरे, नवीन मेंच यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.