हुपरी - कोल्हापूर राज्य मार्गावर उचगांव परिसरात गतिरोधक रमलर बसवा
करवीर तालुका ठाकरे गटाची मागणी
कोल्हापूर - हुपरी - कोल्हापूर राज्य मार्गावर उचगांव परिसरात गतिरोधक रमलर बसवावे, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलीय. या मागणीचे निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. बी. इंगवले यांना दिले.
हुपरी - कोल्हापूर या राज्य मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. इथूनच एक मार्ग कर्नाटकात जातोय. या मार्गावर अवजड वाहनासह मोठी वाहतूक होत असल्याने नेहमी वाहतूक कोंडी होत असते. या राज्य मार्गालगत उचगांव हे गाव वसलेले आहे. उचगांवमधून कोल्हापूरला जात असताना रस्ता ओलांडून विरुध्द दिशेला जाताना अनेक लहान - मोठे अपघात या ठिकाणी होत असतात. याच परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात उचगांवमधील रमेश राठोड या तरुणाचा भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन कोल्हापूर - हुपरी राज्य मार्गावर उचगांव फाटा येथे गतिरोधक रमलर बसावावे, अशी मागणी आज करवीर तालुका ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी. इंगवले यांच्याकडे केलीय.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, माजी युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगले, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे, रामराव पाटील, आबा जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते.