डॉ. शैलेश दिलीप यादव यांना दंत वैद्यकीय क्षेत्रातील ‘Diamond of Dentistry 2025’ पुरस्कार
कोल्हापूर : कोल्हापूर डेंटल असोसिएशनच्या वतीने आयोजित Dentist Day कार्यक्रमात दंत वैद्यकीय क्षेत्रातील दीर्घकालीन, उल्लेखनीय व सेवाभावी कार्याबद्दल डॉ. शैलेश दिलीप यादव यांना ‘Diamond of Dentistry 2025’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. यादव यांनी कोल्हापूर डेंटल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेत अध्यक्ष व सचिव ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य दंत असोसिएशनमध्ये गेली सहा वर्षे संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. यावर्षी त्यांच्या दंत वैद्यकीय सेवेला २५ वर्षे पूर्ण होत असून, रुग्णसेवा व संघटनात्मक कार्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
सतत शिक्षणावर भर देत उच्च दर्जाचे व कुशल उपचार देणे, रुग्णांच्या गरजा व विश्वासाप्रती निष्ठा राखणे, ज्ञानाच्या माध्यमातून रुग्णांना सक्षम करणे, व्यक्तीनुसार तयार केलेली वैयक्तिकृत काळजी तसेच करुणा व विश्वासार्हतेवर आधारित नातेसंबंध निर्माण करणेही त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
या विशेष सन्मानामुळे कोल्हापूरच्या दंत वैद्यकीय क्षेत्राचा गौरव वाढल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.