पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत पहिल्यांदाच महिलांसाठी विशाखा समिती स्थापन
कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पहिल्यांदाच महिलांसाठी विशाखा समिती स्थापन केली आहे. ही समिती अंबाबाई मंदिर, जोतिबा देवस्थान आणि संबंधित कार्यालयांमध्ये कार्यान्वित होईल. हिंदू एकता आंदोलनाच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने ही समिती तातडीने नेमली. समितीचे अध्यक्ष लेखाधिकारी अस्मिता मोटे, तर निवृत्त प्राचार्या डॉ. मंगला पाटील, क्रीडा शिक्षिका उमा भेंडेगिरी आणि व्यवस्थापक महादेव दिंडे यांचा समितीत समावेश आहे
१९९७ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार सर्व शासकीय आणि खासगी संस्थांमध्ये लैंगिक छळ आणि अन्य तक्रारीसाठी विशाखा समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. मात्र, देवस्थान समितीत आजपर्यंत ही व्यवस्था नव्हती. अंबाबाई मंदिराची पाहणी करताना हिंदू एकता आंदोलनाने ही समस्या जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून निवेदन दिले, त्यानंतर प्रशासनाने समिती स्थापन केली.