बालिंगाजवळील पुलाचे काम मुदतीत पूर्ण करा : जिल्हाधिकारी

<p>बालिंगाजवळील पुलाचे काम मुदतीत पूर्ण करा : जिल्हाधिकारी</p>

कोल्हापूर -  जिल्हाधिकारी अमोल येडगे हे आज गगनबावडा दौऱ्यावर होते. यावेळी कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील दोनवडे, बालिंगा दरम्यान सुरु असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी त्यांनी अचानक भेट दिली. गेल्या तीन वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे. यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी पुलाच्या संपूर्ण बांधकामाविषयी माहिती जाणून घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रशांत महाजन यांनी पायल, पिलर आणि फुटिंग कॅप टाकण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचारी वाढवा, मशिनरी वाढवा, दिलेल्या मुदतीत पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे. आता कोणतीही कारणे देऊ नका अशी सक्त ताकीद दिली. यावेळी दोनवडेचे सरपंच सर्जेराव शिंदे, संजय कदम, संजय पाटील यांनी मोरीचे काम रखडल्याचे सांगून पर्यायी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना ऊस तोडणी बाबत अडचणी निर्माण होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. रस्ता रुंदीकरण सुरू असताना जुन्या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

 यावेळी प्रांताधिकारी मोसमी चौगुले, कनिष्ठ अभियंता शुभम पाटील, नवनाथ पवार, मदन पाटील, नितीन पाटील, कर्मचारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.