राज्यातील ‘ही’ वाहने होणार टोल फ्री...
मुंबई – राज्याने इलेक्ट्रिक बसेसबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे इलेक्ट्रिक बसने प्रवास करणे अधिक सुखकर आणि सोयीचे होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसना राज्यातील द्रुतगती महामार्गावर 100 टक्के टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. या निर्णयामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या 'ई-शिवाई' सह सर्व ई-बसेसना द्रुतगती महामार्गावरून टोलमुक्त प्रवास करण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. या निर्णयासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले आहे.