कर्नाटकात तीसहून अधिक ट्रॅक्टर, 100 ट्रॉली, दुचाकी जळून खाक...
बेळगाव – महाराष्ट्रात उसाच्या दराचा विषय चर्चेत असताना कर्नाटकमध्ये उसाच्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. बेळगाव जिल्ह्यात मुधोळ तालुक्यात, उसाला महाराष्ट्राप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी आंदोलन केले जात होते. यावेळी संतप्त शेतकर्यांनी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली. यात तीसहून अधिक ट्रॅक्टर व 100 ट्रॉली, दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
यावेळी तुफान दगडफेक झाली यावेळी अतिरिक जिल्हा पोलिस प्रमुखांसह अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सदर आंदोलनात शेतकर्यांनी आग लावलेली नसून हे समाजकंटकांचे काम आहे. शेतकरी कधीही दुसर्या शेतकर्याच्या ऊसाला आग लावत नाही. शेतकऱ्यांकडून हे कृत्य झाल्याचा मला विश्वास नाही. समाजकंटकांकडून हे कृत्य झाले असून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील सांगितले आहे.