‘या’ दिवशी सुरु होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन
नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १ डिसेंबर २०२५ ते १९ डिसेंबर २०२५ पर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आहे. त्यामुळे या वर्षीचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन १९ दिवस चालणार असल्याची माहितीही यांनी दिली आहे.