…आणि नदीत डुबक्या मारणाऱ्या ‘त्या’ हत्तीवर बॉम्ब फेकला
सिधुदुर्ग – सिधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून ओंकार हत्तीचा वावर आहे. हा ओंकार हत्ती बांदा येथील तेरेखोल-तुळसाण नदीपात्रात डुबक्या मारत असताना त्याच्यावर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. तसा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या अमानवी कृत्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
बांदा परिसरात ओंकार हत्तीला हुसकावून लावण्यासाठी थापट मारणे, दंडुका मारणे असे प्रकार केले जात आहेत. यामुळे प्राणीमित्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.