कोल्हापूर जिल्ह्यात “सरदार@150 एकता पदयात्रे’चे राष्ट्रव्यापी आयोजन
कोल्हापूर - युवक कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने “माय भारत” या राष्ट्रीय युवा मंचाच्या माध्यमातून विकसित भारत पदयात्रा या उपक्रमाचा एक भाग म्हणून “सरदार@150 एकता पदयात्रा” या राष्ट्रव्यापी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर संसदीय कार्यक्षेत्रामध्ये एकूण दोन जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरात जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता पोलीस ग्राऊंड ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.
इचलकरंजी येथे जिल्ह स्तरीय युनिटी पदयात्रा दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता शिवतीर्थ के.एल. मलाबादे - महात्मा गांधी पुतळा - राजवाडा चौक - रसना कॉर्नर नाट्यगृह चांदनी चौक- छत्रपती संभाजी चौक- तीन बत्ती चौक- छत्रपती शाहू महाराज पुतळा - शिवतीर्थ या मार्गे पदयात्रा निघणार आहे. युवकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
तसेच आरोग्य शिबीरे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर व्याख्याने, वादविवाद, ड्रग्जमुक्त भारताची प्रतिज्ञा, विकसित भारत प्रतिज्ञा आदि उपक्रमही घेण्यात येणार आहे.