वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी फॉरेस्टर अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशनकडून मुख्य वनसंरक्षकांना मागण्यांचं निवेदन 

<p>वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी फॉरेस्टर अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशनकडून मुख्य वनसंरक्षकांना मागण्यांचं निवेदन </p>

कोल्हापूर - पुणे जिल्ह्यातील शिरुर परिसरात बिबट्याने दोन लहान मुले आणि एका वृद्ध महिलेचा जीव घेतला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाचे कार्यालय आणि शासकीय वाहन जाळून टाकले. त्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मानव व वन्यजीव संघर्ष हा दिवसागणिक वाढत चालला आहे त्यामुळे  वन  विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी फॉरेस्टर अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशनच्यावतीने गुरुवारी काळ्याफिती लावून निषेध करण्यात येणार आहे.


शिरुर सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये तसेच वन कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये यासाठी वन कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आवश्यक पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, वन कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विभागाकडून गांभीर्यपूर्वक धोरण ठरविण्यात यावं, अशा मागण्यांचे निवेदन फॉरेस्टर अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशनच्यावतीने  मुख्य वनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांना देण्यात आले.
यावेळी  वनपाल वनरक्षक संघटनेचे प्रदेश सचिव  अंबाजी बिराडे, वनवृत्त कोल्हापूर संघटनेचे सर्कल अध्यक्ष  सुरेश चरापले, सर्कल सचिव संजय कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.