बांधकाम कामगारांची एजंटांकडून राजरोस लूट...
									
																		
																											 
																	कोल्हापूर - बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ देण्याच्या नावाखाली एजंटांकडून दुकानदारी थाटत लूट सुरू असल्याचा आरोप लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केला आहे.
ज्या बांधकाम कामगारांना यापूर्वी सुरक्षा संच, अत्यावशक संच मिळालेला नाही. फक्त त्यांनाच आता संच मिळणार असल्याने बांधकाम कामगारांनी एजंटांच्या आमिषांना बळी पडू नये असे आवाहनही मगदूम यांनी केले आहे.
