दालमिया साखर कारखान्याची ऊस वाहतूक स्वाभिमानी संघटनेने रोखली...

<p>दालमिया साखर कारखान्याची ऊस वाहतूक स्वाभिमानी संघटनेने रोखली...</p>

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी आंदोलन पुकारले असताना ऊस तोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर कोपार्डे येथे रात्री आठ वाजता आंदोलन करत दालमिया साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर रोखून धरले. उसाला एक रकमी एफ आर पी ३ हजार ७५१ रुपये दर जाहीर करून साखर कारखाने सुरू करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही काळ वाहतूक रोखून धरली तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्यामुळे  रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. कारखान्याचे अधिकारी आल्यानंतर ऊस तोडी थांबवितो ऊस दर जाहीर करू असे आश्वासन दिल्यानंतर ट्रॅक्टर सोडण्यात आले.