यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेतील कामांची समितीकडून तपासणी...

<p>यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेतील कामांची समितीकडून तपासणी...</p>

कोल्हापूर - यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत मूल्यमापनासाठी राज्यस्तरीय समिती आज कोल्हापूर जिल्हा परिषदेत दाखल झाली. या समितीने जिल्हा परिषदेच्या कामकाजाची तपासणी केली. या तपासणीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकारी नेहमीपेक्षा अतिशय शिस्तबद्ध होते.

 हिंगोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर ठोंबरे हे या समितीचे अध्यक्ष असून समितीमध्ये केशव एल. गड्डापोड आणि प्रकाश शेंडगे हे दोन सदस्य आहेत. या समितीने यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत प्रस्तावाच्या कागदपत्रांची तपासणी केली. ग्रामपंचायत विभाग, मनरेगा, कृषी विभाग, महिला आणि बालकल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, वित्त, स्वच्छ भारत मिशन, सामान्य प्रशासन, समाजकल्याण विभाग, बांधकाम  आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशा विविध विभागांची तपासणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा परिषदेने यापूर्वी, या अभियानात अतिउत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.