परीख पुलाने घेतला मोकळा श्वास...
रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना दिलासा
कोल्हापूर - आजपासून परीख पुलाजवळील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजारामपुरी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. सध्या या मार्गावरील वाहने पर्यायी मार्गाने वळवल्याने वर्दळीचा असणारा हा रस्ता मोकळा श्वास घेवू लागला आहे. त्यामुळे ये – जा करणाऱ्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रस्त्याच्या कामामुळे आजूबाजुची अतिक्रमणही काढण्यात आली आहेत त्यामुळे राजरोसपणे कसरत करत प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.