कसबा बावड्यातील राजर्षी शाहू जन्मस्थळ वस्तू संग्रहालयाचे लवकरात लवकर उद्घाटन करण्याची मागणी
कोल्हापूर – शिवशस्त्र शौर्यगाथा या भव्य मराठा कालीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस येथे करण्यात आले आहे. या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते झाले. मात्र हा कार्यक्रम होत असतानाच राजर्षी शाहू जन्मस्थळ वस्तू संग्रहालयाचेही उद्घाटन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याचे उद्घाटन झाले नाही, त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांना निवेदन देऊन राजर्षी शाहू जन्मस्थळ संग्रहालयाचेही लवकरात लवकर उद्घाटन करण्याची मागणी केल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले आहे.