करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेकडून राज्य परिवहन मंडळाला निवेदन
कोल्हापूर - डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेकरिता कोल्हापुरातून यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी चांगल्या आणि सुरक्षित एस टी गाड्या उपलब्ध करून द्याव्यात. सौंदती यात्रेसाठी गेल्यावर्षी प्रमाणेच दर पत्रक लागू करावे. यासाठी आज करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संस्थेच्यावतीने राज्य परिवहन मंडळाचे कोल्हापूर विभागीय प्रभारी नियंत्रक यशवंत कानतोडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अनिता पोवार, उपाध्यक्ष सुरेश बिरंबोळे, संजय मांगलेकर, प्रशांत खाडे, किरण मोरे, प्रदीप साळुंखे, बाबुराव पाटील, अनिल देवणे, राजू जाधव, उदय पाटील आदी उपस्थित होते.