जुना बुधवार तालीम मंडळाच्या नूतन वास्तूचे खा. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन

<p>जुना बुधवार तालीम मंडळाच्या नूतन वास्तूचे खा. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन</p>

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील जुना बुधवार तालीम मंडळाच्या नूतन वास्तूचे खा. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान या उद्घाटन कार्यक्रमानंतर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.

जुना बुधवार तालमीची १८३८ साली स्थापना झाली आहे. जुना बुधवार पेठेचा कोल्हापूरच्या इतिहासाशी जुना ऋणानुबंध असुन ज्या ब्रह्मपुरी टेकडीवर मूळ कोल्हापूर होते. त्याच्या पायथ्यालाच जुना बुधवार पेठ आहे. आणि या नावानेच जुना बुधवार तालमीची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला ही तालीम एक मजली होती. त्यानंतर दुमजली आणि आता तीन मजली झालीय. नव्या धाटणीची बांधणी झालीय. सध्या नव्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी ताराराणी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या १४ फूट उंचीच्या प्रतिमा उभारल्यात.

यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर महादेव आडगुळे, माजी उपमहापौर नंदकुमार मोरे, दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, जुना बुधवार तालीम मंडळाचे अध्यक्ष रणजीत शिंदे, उपाध्यक्ष संतोष दिंडे, सचिव सुनिल शिंदे, सुशिल भांदिगरे यांच्यासह तालमीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.