ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

पुणे - ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे आज सकाळी निधन झाले आहे. यावेळी त्यांचे वय १०० वर्ष होते. भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचणारे डॉ. विक्रम साराभाई यांचे ते सहकारी होते.
त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला होता त्यामुळे त्याचं कोल्हापूरशी एक वेगळं नातं आहे. श्रीहरीकोटा येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा त्यांनीच निश्चित केली होती. सहकारी आणि सॅटेलाईट टीव्हीच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रा. एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटा आहे.