इंगळी गावच्या प्रवेश व्दाराजवळ भानामतीचा प्रकार...

<p>इंगळी गावच्या प्रवेश व्दाराजवळ भानामतीचा प्रकार...</p>

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील इंगळी गावाच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ भानामतीचा प्रकार घडल्याचे आढळून आले आहे. यावेळी रस्त्यावर केळीचे झाड, केळी, पांढऱ्या कापडावर कुंकू, लिंबू आणि प्राण्याचे हृदय ठेवण्यात आले होते. काल रात्री लक्ष्मी पूजना दिवशी हा प्रकार केला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
आज सकाळी हा सर्व प्रकार झाल्याचं कळताच घटनास्थळी सरपंच दादासो मोरे आणि हुपरी पोलिसांनी भेट देवून पाहणी केली. हा प्रकार चार ते पाच लोक मिळून करत असल्याचं सीसीटीव्ही कैमेरात दिसून आले आहे परंतु त्यांचे चेहरे अस्पष्ट असल्याने नेमकी व्यक्ती समजू शकली नाही त्यामुळे हुपरी पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.