कळेतील फिल्टर हाऊसच्या टाकीत आढळला नाग....

पन्हाळा तालुक्यातील कळे गावाला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसच्या टाकीत चक्क नाग आढळल्याचा प्रकार समोर आलाय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी टाकीतील पाणी सोडून दिलं. या टाकीच्या परिसरात झाडा झुडपांचं साम्राज्य असून याठिकाणी अनेकदा विविध प्रकारचे कीटक, साप आढळून येत असतात. यापूर्वी देखील हे जीवजंतू टाकीत पडल्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे त्यामुळं ग्रामपंचायत प्रशासनानं या टाकीची तसंच परिसराचीही स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांमधून होतेय.