महापालिकेत 58 कर्मचाऱ्यांना पदोन्नती, 12 स्टाफ नर्सची नवीन नियुक्ती

<p>महापालिकेत 58 कर्मचाऱ्यांना पदोन्नती, 12 स्टाफ नर्सची नवीन नियुक्ती</p>

कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या विविध विभागांतील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक अशा 58 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी पदोन्नती छाननी समितीची मान्यता मिळाली आहे. ही बैठक छत्रपती ताराराणी सभागृहात आज पार पडली. वरिष्ठ लिपिक पदावर 15 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलीय, तर कनिष्ठ लिपिक पदावर – 43 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलीय. छाननी समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पदोन्नत्ती छाननी समितीमध्ये सहा.आयुक्त उज्वला शिंदे, मुख्यलेखापरिक्षक कलावती मिसाळ, कामगार अधिकारी-राम काटकर, रवका अधिकारी-प्रशांत पंडत, नगरसचिव-सुनिल बिद्री हे सदस्य होते.

 

एनयूएचएम अंतर्गत 12 स्टाफ नर्सची नियुक्ती -

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत 12 स्टाफ नर्सची नियुक्ती करण्यात आली असून, प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेनंतर नियुक्तीपत्र लवकरच देण्यात येणार आहेत.