इचलकरंजीत शिवतीर्थ ते गांधी पुतळा मार्गावर दिवाळी बाजार भरवण्यास कोर्टाची मनाई...सर्किट बेंचचा निकाल 

<p>इचलकरंजीत शिवतीर्थ ते गांधी पुतळा मार्गावर दिवाळी बाजार भरवण्यास कोर्टाची मनाई...सर्किट बेंचचा निकाल </p>

इचलकरंजी – गेल्या अनेक वर्षापासून इचलकरंजी शहरातील  शिवतीर्थ ते गांधी पुतळा या मुख्य मार्गावर दिवाळी बाजार भरवला जातो. शहरातील या  मुख्य मार्गावर दिवाळी बाजार भरत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. तसेच या बाजारामुळे अपघाताचे अनेक प्रसंग घडले असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार कोर्टाने या मार्गावर दिवाळी बाजार भरवण्यास सक्त मनाई केली आहे. हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे.
‘रस्त्यावर बाजार भरणार नाही’ याची काळजी इचलकरंजी महापालिकेने घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे खूप वर्षापासून या मार्गावर भरवला जाणारा बाजार आता भरणार नाही.