इतिहासातील सर्वांत मोठी शरणागती...
गडचिरोलीत नक्षलवादी भूपतींसह 60 सहकाऱ्यांनी केलं आत्मसमर्पण

गडचिरोली – आज गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे इतिहासातील ही आजवरची सर्वांत मोठी शरणागती ठरली आहे.
माओवादी विरोधातल्या लढाईत या नक्षलवाद्यांनी पत्करलेल्या आत्मसमर्पणामुळे हा गडचिरोली पोलिसांचा मोठा विजय ठरला आहे.
शरण आलेले माओवाद्यांनी त्यांचा शस्त्रसाठा मुख्यमंत्र्यांसमोर खाली ठेवला आहे. त्यामुळे माओवाद विरोधातल्या लढ्यात एक मोठा विजय गडचिरोली पोलिसांनी कुठल्याही रक्तपाता शिवाय मिळवला आहे.