निर्दोष मुक्तता झालेल्या हिंदुत्ववाद्यांचा कोल्हापूरात सत्कार

कोल्हापूर – शहरातील गायन समाज देवल क्लबमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या हिंदुत्ववाद्यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समीर कुलकर्णी, मेजर रमेश उपाध्याय आणि संशयिताच्या निर्दोष मुक्ततेसाठी वीना मोबदला न्यायालयीन लढाई लढलेले अॅडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, प्रीती पाटील, समीर पटवर्धन, लेखक विक्रम भावे यांचा हरिभक्त परायण महादेव यादव महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मेजर रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी यांनी मालेगाव बॉम्ब स्फोट, दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणातून षडयंत्र रचत तत्कालीन सरकारने हिंदू धर्माला बदनाम केल्याचा आरोप केला आहे. हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट, विक्रम भावे, अॅडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही मनोगतं व्यक्त केली. यावेळी स्वाती खाडे, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, गजानन तोडकर, मंदिर महासंघाचे अशोक गुरव, उदय भोसले, संभाजीराव भोकरे, राजू यादव, नितीन वाडीकर, सुरेश यादव यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.