गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूकीची फेर व्यवस्था करा : व्यापाऱ्यांची  पोलीस निरीक्षकांकडे मागणी 

<p>गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूकीची फेर व्यवस्था करा : व्यापाऱ्यांची  पोलीस निरीक्षकांकडे मागणी </p>

कोल्हापूर - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत पोलीस प्रशासनानं  जो बदल केला आहे तो मूळ बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बाजारपेठेच्या मध्यभागी पार्किंग करून ग्राहकांना मूळ बाजारपेठेत येण्यास मज्जाव करणं  हे व्यापारी वर्गावर अन्यायकारक आहे. कुणावरही  अन्याय होणार नाही , याची दक्षता घेऊन फेर वाहतूक व्यवस्था करावी, अशी मागणी मार्केट मधील सर्व व्यापारी आणि करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं  केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना दिले आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, युवा सेना जिल्हाप्रमुख सुनील चौगुले, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, किशोर कामरा, दीपक अंकल, विनोद रोहिडा,  बाळासाहेब नलावडे, वसंत पवार,  कृष्णात हेगडे,  सचिन माने, शिवाजी लोहार आदि उपस्थित होते.