कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ओव्हरलोड रिक्षांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई

<p>कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ओव्हरलोड रिक्षांवर वाहतूक शाखेची धडक कारवाई</p>

कोल्हापूर - मध्यवर्ती बस स्थानक परिसरात आज शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई सुरु केलीय. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

कारवाईदरम्यान अनेक रिक्षाचालकांकडून प्रवासी क्षमतेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या रिक्षा तातडीने थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्याचाही प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समजते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक असून, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक ही अपघातांना कारणीभूत ठरू शकते, असे वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, आरटीओ निरीक्षक विनायक सूर्यवंशी आणि ज्योती पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.