कोल्हापुरात १२ ऑक्टोबरला ‘५ वी वर्षावास धम्म परिषद’

<p>कोल्हापुरात १२ ऑक्टोबरला ‘५ वी वर्षावास धम्म परिषद’</p>

कोल्हापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९६५ रोजी लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या "बुध्द आणि त्यांचा धम्म" या महाग्रंथ वाचनाची सांगता करण्यासाठी कोल्हापुरातील धम्म निनाद फौंडेशनच्या वतीने ५ वी वर्षावास धम्म परिषद २०२५" या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही धम्म परिषद एकूण तीन सत्रात होणार असल्याची माहिती आयोजक विजय कुषाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पहिल्या सत्रात चंद्रकात सुर्यवशी यांच्या हस्ते या धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. डॉ. पी. एस. कांबळे हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर अतुल भोसेकर हे "सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मक्रांतीचा वारसा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

तिसऱ्या सत्रात आंबेडकरी चळवळीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा होणार असून त्यानंतर अमित मेधावी यांचे बौध्द धम्मातील समता आणि भन्ते डॉ. यश कश्यपायन यांचे आपण तथागत बुध्दाकडे का जायचे या विषयावर प्रबोधनात्मक संबोधित करणार आहेत.

या  पत्रकार परिषदेला बाजीराव कांबळे, चंद्रकात सुर्यवशी, पी. एस कांबळे, विलास कांबळे, संजय कुर्डकर, विद्याधर काळे यांच्यासह धम्मनिनाद फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते.