जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सायकलने गाठले कार्यालय...

कोल्हापूर – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वाहतूक आणि ऊर्जा बचतीसाठी आज शुक्रवारी 'ग्रीन डे आणि अर्थ मिनिट' उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी सायकलने आणि चालत किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने कार्यालय गाठले. 

जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी देखिल आज त्यांच्या शासकीय वाहनांचा वापर न करता हे दोघेही आज सायकलने कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सकाळी दहा वाजता त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून सायकलने प्रवास करत ते कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचले. सायकल वरून येत असतानाच त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी देखील संवाद साधला. 
जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. हे नेहमी त्यांच्या, शासकीय ईनोव्हा या वाहनातून कार्यालयात येत असतात. त्यासोबतच वाहनाचा चालक सेक्युरिटीसाठी पोलीस कॉन्स्टेबल असतात. मात्र  ग्रीन डे आणि अर्थ मिनिट” या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून सायकलने प्रवास केला. त्यासोबतच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषदमधील मुख्या लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह सर्वच विभाग प्रमुखांनी ग्रीन डे च्या पार्श्वभूमीवर कार्यालयात वाहन न आणता,  कोणी सायकलने तर कोणी चालत प्रवास करत कार्यालयात आले होते. 
त्यासोबतच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेतील इतर कर्मचारी देखील आज सायकलने कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी पर्यावरणपूरक वाहतूक आणि ऊर्जाबचतीसाठी विशेष संदेश देण्यात आला.