संविधानाची प्रत विक्री अन् प्रकाशन करण्यास कोर्टाची बंदी...

नवी दिल्ली – संविधानाची प्रत विक्री आणि प्रकाशन करण्यास दिल्ली कोर्टाने बंदी घातली आहे. रूपा पब्लिकेशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला संविधानाच्या लाल-काळ्या रंगातील पॉकेट आवृत्तीचे प्रकाशन आणि विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
ईस्टर्न बुक कंपनी अर्थात ईबीसीने याबाबत दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला आहे. दोन आठवड्यांच्या आत सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून आपला मजकूर काढून घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.